जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त
जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता …